कृषि उत्पन्न बाजार समिती, मोहोळ

शेतकी प्रधान भारतातील शेतकरी वर्गाची उन्नती करण्याचे उददेशाने सन 1939 मध्ये सरकारने सन 1939 चा शेती मालाच्या खरेदी विक्रीच्या नियमनाबाबतच्या कायदयाची निर्मीती केली.

मुंबई सरकारने दि बॉम्बे ॲग्रीकल्चरल प्रोडयूस मार्केटस ॲक्ट 1939 हा कायदा, सदरहू कायदयाच्या कलम 4 पोटकलम 1 अन्वये नोटिफिकेशन नं. पीएमए 3654 दि.14/12/1954 रोजी सरकारी गॅझेट 4 ब मध्ये प्रसिध्द करुन मोहोळ तालुक्यास 1 मार्च 1955 पासून लागू केला. आणि कलम 5 अन्वये नोटिफिकेशन नं. पीएमए 3654 (ब) दि. 14/12/1954 अन्वयेदि ॲग्रीकल्चरल प्रोडयूस मार्केट कमिटी मोहोळ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेत शेतकरी, व्यापारी व सरकारी असे एकुण 15 सभासदांची सरकारकडून नेमणुक करण्यात आली.

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदीविक्री करण्यासाठी लोकनेते बाबुराव पाटील – अनगरकर यांनी स्वतंत्रपणे 1954-55 च्या दरम्यान मार्केट ‍कमिटीची स्थापना केली. कमिटीची पहिली मिटींग मे प्रांत ऑफीसरसाहेब माढा भाग यांचे अध्यक्षतेखाली भरली होती. या सभेत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवडणूक करण्यात आली. मोहोळ येथील श्री. संभाजीराव रामचंद्र गरड हे चेअरमन श्री.विश्वनाथ बापूराव शेंडे हे व्हा. चेअरमन म्हणून निवडले कमिटीच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात 1 जानेवारी 1956 पासून झाली.

ॲग्रीकल्चरल प्रोडयुस मार्केट कमीटी मोहोळचे मार्केट क्षेत्र संपुर्ण मोहोळ तालुका आहे. सरकारने ॲग्रीकल्चरल प्रोडयुस मार्केट ॲक्ट सेंक्शन 2 - ए, 7 – अ पोटकलम प्रमाणे गव्हर्नमेंट नोटीफीकेशन नं. पीएमए 3655 (अ)दि. 11/07/1955 ने मोहोळ येथील भुसार पेठ मार्केट यार्ड म्हणून जाहिर केली. सरकारने ॲग्रीकल्चरल प्रोडयुस मार्केट कानू 51-ब अन्वये खालील भाग गव्हर्नमेंट नोटीफीकेशन नं. पीएमए3622 –अ दि. 11/07/1955 ने मार्केट प्रॉपर म्हणून जाहीर केले आहे. (1) मोहोळ ग्रामपंचायत (पुर्वीची) आताची नगर परीषद (आत्ताची) हददीतील संपुर्ण भाग, मोहोळ नगर परीषद हददीबाहेरील सर्व गावे उदा. पाटकुल, पेनूर, कुरुल, अनगर, आष्टे, वडवळ, सावळेश्‍वर या मार्केट प्रॉपरचे क्षेत्रात नियमित शेतीमालाचा घाऊक विक्रीस सक्त मनाई आहे. फक्त किरकोळ व्यापाऱ्यास हरकत नाही.

मोहोळ मार्केट क्षेत्रात खलील शेतीमालाचे नियपन नोटीफीकेशन नं. पीएमए 3654 दि. 14/12/1954 प्रमाणे करण्यात आले आहे. उदा. शेंग, शेंगदाणा, ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा इत्यादी.

मार्केट यार्डामध्ये नियमित केलेल्या शेती मालाचीविक्री उघड लिलाव पध्दतीने होते. पालाचे वजन लायसेन्स तोलार, मार्केट यार्डावरच कमिटीचे कर्मचारी देखरेखी खाली बरोबर तोला करीत असतात. मालाची ने आण व उचल करणारे हमाल हे कमिटीने लायसेन्स दिलेले हमाल आहेत. व्यापारीची उलाढाल शेतीत निर्माण मालाच्या उत्पादनावर अवलंबून असते. उत्पादन हे पडणाऱ्या पावसावर व जमिनीच्या परिस्थतीवर अवलंबून असते.

लोकनेते स्व. बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांच्या निधनानंतर माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समीतीचे त्यावेळेचे सभापती, उपसभापती व संचालक यांनी बाजार समीती सक्षम झाली पाहीजे हे धोरण राबविले. त्यामाध्यतून सुशीक्षीत बेरोजगार, उदयोजक, शेतकरी, शेतमाल विकत घेणारे आडत व्यापारी यांच्यासाठी नियोजनबध्द विकासात्मक आराखडा तयार करण्यात आला. उदा. 160 पक्क्या बांधकामाचे गाळे बांधण्यात येवून तालुक्यातील शेतीपुरक तसेच विविध छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापारी, भुसार मालाचे आडत व्यापारी यांना भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. परिणामी या माध्यमातुन मोहोळमध्ये एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली. आर्थीक चलन फिरण्यासाठी यांचा फार मोठा उपयोग झाला आहे.

आजमितीला सभापती धनाजी गावडे व उपसभापती प्रशांत बचुटे यांच्यासह संचालक सर्वजण शेतकरी, ग्राहक व व्यापारी यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून भविष्यकाळामध्ये जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती असा नावलौकीक निर्माण करणार असा मानस आहे.